Crorepati SIP : केवळ 10 वर्षांत करोडपती! एकरक्कमी गुंतवणूकही नाही, मग कसा होईल भाऊ फायदा?

Crorepati SIP : झटपट श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण जगात प्रत्येकाला लॉटरी थोडीच लागते. पण त्यासाठी मन खट्टू करु नका. पैशांचे योग्य नियोजन केल्यास तुम्हालाही 10 वर्षांत करोडपती होता येईल.

Crorepati SIP : केवळ 10 वर्षांत करोडपती! एकरक्कमी गुंतवणूकही नाही, मग कसा होईल भाऊ फायदा?
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 11:56 AM

नवी दिल्ली : झटपट श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण जगात प्रत्येकाला लॉटरी थोडीच लागते. पण त्यासाठी मन खट्टू करु नका. तुम्ही खर्च करण्यावर चाप लावला तर श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आता नोकरी लागली की, त्यातील अर्धीहून रक्कम क्रेडीट कार्डची (Credit Card) रक्कम चुकती करण्यात खर्ची पडते. अथवा महागड्या वस्तूंचा नाहक भरणा वाढतो. त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी तरुणपणीच बचत केली, पैशांचे योग्य नियोजन केल्यास तुम्हालाही 10 वर्षांत करोडपती (Crorepati) होता येईल. त्यासाठी अनेक बचत योजना असल्या तरी म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूक फायद्याची ठरेल.

म्युच्युअल फंडात एसआयपी (Mutual Fund SIP) केल्यास योग्य आणि निश्चित गुंतवणूक करता येईल. त्याआधारे तुम्हाला कोट्याधीश होता येईल. म्युच्युअल फंडात इक्विटी म्युच्युअल फंडात (Equity Mutual Funds) गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. अल्पबचतीतून तुम्हाला मोठे उद्दिष्ट गाठता येईल. तुम्ही काही वर्षानंतर हमखास लखपती, करोडपती व्हाल. नियमीतपणे बचत केल्यास दीर्घकाळानंतर मोठा निधी जमा करता येईल. दीर्घकालावधीसाठी म्युच्यअल फंडातील गुंतवणुकीवर कमीत कमी 12 टक्के वार्षिक परतावा मिळतो. त्याचा फायदा होईल. परताव्याची रक्कम व्याजानुसार वाढू ही शकते.

तुम्ही 0 वर्षांसाठी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करु शकता. या दहा वर्षात तुम्हाला नियमीत गुंतवणूक केल्यास मोठा निधी उभारता येईल. हे लक्ष्य गाठण्यासाठी तुम्हाला मासिक एसआयपीत एन्युअल स्टेप-अपचा (Annual Step-up) वापर करुन हा चमत्कार घडेल. स्टेप-अप एसआयपीच्या सुविधेमुळे, एसआयपीमध्ये तुमची रक्कम एका विशेष काळात वाढते. प्रत्येक वर्षी एसआयपीची रक्कम काही टक्क्यांनी वाढते. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. तुम्हाला आर्थिक गरजानुसार, एसआयपीच्या रक्कमेत गुंतवणूक वाढविता येईल.

हे सुद्धा वाचा

जर तुम्हाला 10 वर्षांत एसआयपीच्या माध्यमातून एक कोटी उभे करता येईल. एन्युअल स्टेप-अप (Annual Step-up) 20 टक्के ठेवता येईल. एसआयपी गणनेनुसार (SIP calculator) , तुम्हाला 12 टक्के वार्षिक रिटर्नच्या हिशोबाने 21,000 रुपयांची मासिक बचत करावी लागेल. मासिक एसआयपी 21,000 रुपये ठेवल्यास, कमीत कमी 12 टक्के परताव्याने, एन्युअल स्टेप-अप 20 टक्के केल्यास पुढील 10 वर्षानंतर एक कोटींचा फंड उभारता येईल. म्हणजे 21-22 व्या वर्षी जर तुम्ही पगारातील एवढी रक्कम बाजूला टाकली तर 35 वर्षाच्या आताच तुम्ही करोडपती व्हाल. एसआयपीच्या गणनेनुसार, दहा वर्षात तुम्ही एकूण 65,41,588 रुपये गुंतवणूक करा. त्यावर 38,34,556 रुपये परतावा मिळेल. एकूण 1,03,76,144 रुपये मिळतील.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.