SIP : दरमहाची छोटी गुंतवणूक, करेल तुम्हाला काही वर्षातच करोडपती..

SIP : दरमहा केलेली छोटी गुंतवणूक तुम्हाला मालामाल केल्याशिवाय राहणार नाही..

SIP : दरमहाची छोटी गुंतवणूक, करेल तुम्हाला काही वर्षातच करोडपती..
गुंतवणुकीसाठी हा पर्याय उत्तमImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 9:28 PM

नवी दिल्ली : बचतीची सवय (Saving Habit) सर्वात चांगली असते. अनेकदा नोकरदार वर्ग (Salaried person) योग्य माहिती अभावी, नियोजनाअभावी वेतनातील काही रक्कम बचतीसाठी मागे सोडत नाही. पण एक छोटी बचत गुंतवणूकदारांना (Investors) काही वर्षांनी कमाईदार केल्याशिवाय राहत नाही.

पद्धतशीर गुंतवणूक योजनेतून (Systematic Investment Plan-SIP) तुम्ही तुमचे उद्दिष्ट गाठू शकता. SIP हे गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय मानण्यात येतो. यामध्ये तुम्हाला कमी रक्कमेत गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होतो. त्याचा खिशावर ताण येत नाही.

SIP दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय मानण्यात येतो. या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो. म्हणजे चक्रवाढ व्याजाचा फायदा दरवर्षाला मोठा फायदा मिळवून देतो.

हे सुद्धा वाचा

SIP मुळे तुम्ही छोटी पण नियमीत बचत करु शकता. त्यासाठी तुम्ही साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक हप्ता निवडू शकता. एसआयपीसाठी तुम्हाला मोठी रक्कम एकदाच गुंतविण्याची आवश्यकता नाही.

SIP दरमहा तुम्ही एक ठराविक रक्कम गुंतवू शकता. पण ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी केली तरच तुम्हाला त्यातून फायदा दिसून येतो. या योजनेत 100 ते 500 रुपयांदरम्यान तुम्हाला गुंतवणूक करता येते.

एसआयपी मार्फत गुंतवणुकीची प्रक्रिया अत्यंत सोपी असते. बँक खाते म्युच्युअल फंडच्या खात्याशी एकदा लिंक केले की, एका निश्चित तारखेला या खात्यातून आपोआप कपात होईल आणि ती म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे जमा होईल.

शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणे धोक्याचे असते. त्यामानाने म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमी जोखिमीची असते. त्यामुळे एसआयपीची गुंतवणूक सर्वात फायदेशीर आणि लोकप्रिय ठरली आहे.

एसआयपीवर लोकांचा विश्वास कमी न होता वाढलेला आहे. असोसिएशन्स ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया यांच्या आकडेवारीनुसार, देशात ऑगस्ट 2022 पर्यंत एसआयपी खात्यांची संख्या वाढून 5.71 कोटी झाली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.