Gold Purity : सोनारानं गंडवलंय की नाही ओळखा एका मिनिटांत, या ट्रिकने चोरावरच व्हा मोर! सराफाला दाखवा खरेपणाचा आरसा

Gold Purity : आता हॉलमार्क अनिवार्य असताना कोणता सोनार तुम्हाला गंडवले, असे तुम्हाला वाटतं असेल तर थोडं थांबा, या मुलाची फसवणूक पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल, अशी करण्यात येते फसवणूक...

Gold Purity : सोनारानं गंडवलंय की नाही ओळखा एका मिनिटांत, या ट्रिकने चोरावरच व्हा मोर! सराफाला दाखवा खरेपणाचा आरसा
मिनिटात करा चेक
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 9:37 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने या 1 एप्रिल 2023 रोजीपासून देशातील सोन्याच्या दागिन्यांवर, आभुषणांवर हॉलमार्क (Hallmark Gold) अनिवार्य केले आहे. शुद्ध सोन्याच्या हमीसाठी आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) हे पाऊल टाकलं आहे. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतोच की आणि चकाकतं ते सारंच काही सोनं नसतं! हॉलमार्किंगच्या आडून ही सोनार गंडा घालत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. सोनाराची चालाखी या एका ट्रिकने पकडली जाऊ शकते, घरच्या घरीच काय, तुम्ही थेट सराफा दुकानदारालाच आरसा दाखवू शकता

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल धैर्य अंदानी या तरुणाने Instagram,Facebook वर पोस्ट केलेला हा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओत धैर्यने त्याची सोने खरेदीत कशी फसवणूक झाली आणि ती त्याने कशी शोधली याची माहिती आहे. सोनार कशी चालाखी करतात आणि ग्राहकांना गंडवितात, याची माहिती धैर्यने त्याच्या व्हिडिओत दिली आहे. त्याने ही फसवणूक ओळखण्यासाठी खास ट्रिकही सांगितली आहे.

कशी होते फसवणूक

हे सुद्धा वाचा
  1. वजनात होते फसवणूक सोने खरेदी करताना त्याचे वजन आवश्य तपासा. तुम्ही किती कॅरेटचे सोने खरेदी केले हे जसे महत्वाचे आहे. तसेच ते किती ग्रॅम, तोळ्याचे आहे, हे पण चांगले तपासा. नाहीतर कमी वजनाचे सोने, जास्त किंमतीला माथी मारण्याचे प्रकार ही घडतात. एकादा बिल झाल्यावर मात्र दुकानदार तुम्हाला मदत करत नाहीत. त्यामुळे घाई घाईत सोने खरेदी करुच नका.
  2. सोन्याची गुणवत्ता असते कमी सोन्याची गुणवत्ता कॅरेटमध्ये मोजतात. कॅरेट हे परिमाण आहे. सोने जितके अधिक शुद्ध ते तेवढे सोप्यारित्या मोडले जाते. वितळते. सोन्याच्या धातू पासून अनेक दागिने, आभुषणे व इतर वस्तू तयार करण्यात येतात. सोन्याला विविध आकारात मोडता येते. सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना मजबूत करण्यासाठी यामध्ये इतर धातूंचे मिश्रण करतात. त्यामुळे सोन्यापासून तयार होणाऱ्या वस्तू सहजासहज तूटत नाहीत.
  3. हॉलमार्किंगमध्ये फसवणूक सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्हाला सोन्याचे शिक्के, दागिने, आभुषणे, बिस्किट, तुकडा कशाची खरेदी करायची ते अगोदर ठरवा. त्यावरील हॉलमार्क (Hallmark on Gold Jewellery) तपासा. केंद्र सरकारने 1 एप्रिल, 2023 रोजीपासून सर्व दागिन्यांवर 6 क्रमांकाच्या हॉलमार्क (Hallmarking Rules) असणे अनिवार्य केले आहे. कोणताही दुकानदार विना 6 क्रमांकाच्या हॉलमार्क शिवाय दागिन्यांची विक्री करु शकत नाही.

सराफा असा घालतो गंडा सराफा दुकानदार तुम्हाला हॉलमार्किंगमध्ये पण गंडवितो. या तरुणाने व्हिडिओत याविषयीचा दावा केला आहे. त्यानुसार, त्याने सोने 22 कॅरेट सोने खरेदी केले. सोन्याच्या अंगठीवर 22 कॅरेट चिन्हांकित पण केलेले आहे. पण तरीही त्याची सोनाराने चालाखीने फसवणूक केली. तुमच्याबाबतीत पण अशीच फसवणूक होऊ शकते. तेव्हा सावध रहा.

अशी ओळखा फसवणूक तुम्ही सोनं खरेदी केल्यानंतर त्यावर हे सोनं किती कॅरेटचं आहे, याची माहिती देण्यात येते. हे सोनं 18 Carat, 22 Carat अथवा 24 Carat किती आहे, त्यावर चिन्हांकित असते. त्याआधारे आपण सराफा दुकानदाराला पैसे देतो. यामध्येच फसवणूक होते. दुकानदार 22 कॅरटंच सांगून 18 कॅरटंच सोनं माथी मारतो. दुकानदाराची ही चालाखी तुम्ही पण पकडू शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.