Unclaimed Money : जाणून घ्या कुठे लपलाय वाडवडिलांचा पैसा! ही आहे सोपी पद्धत

Unclaimed Money : नशीब कधी उघडेल ते काही सांगता येते का, एक प्रयत्न करुन पाहिल्यास, कदाचित तुम्हाला लॉटरी लागू शकते. तुमच्या वाडवडिलांचा पैसा हाती लागू शकतो, कसं ? तर असं...

Unclaimed Money : जाणून घ्या कुठे लपलाय वाडवडिलांचा पैसा! ही आहे सोपी पद्धत
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 8:38 PM

नवी दिल्ली : देशातील बँकांमध्ये दावा न केलेली कोट्यवधींची रक्कम पडून आहेत. हजारो कोटी रुपये या बँकांच्या तिजोरीत अडकलेले आहेत. आता कोट्यवधी रुपयांवर कोणीच दावा सांगत नसल्याने भारतीय केंद्रीय बँक (RBI) आणि केंद्र सरकारने त्यावर तोडगा काढला आहे. भारतीय बँकांमध्ये हजारो कोटी रुपये (Unclaimed Amount) पडून आहेत. पण त्यावर दावा सांगणारे मालक गायब आहे. खरे मालक शोधण्यासाठी व्यापक शोध मोहिम राबविण्यात येत आहे. हुकून चुकून आपल्या वाड-वडिलांनी जर बँकेत खातं उघडलं असेल आणि त्यांची माहिती कोणालाच नसेल, तर त्यांच्या बचतीवर, ठेवीच्या रक्कमेवर आता तुम्हाला दावा सांगता येईल.

100 दिवसांत 100 दावे केंद्रीय बँकेने देशातील सर्वच बँकांना 100 दिवसांत 100 दावे हे अभियान सुरु करण्यास सांगितले आहे. त्यामुळे येत्या 100 दिवसांत प्रत्येक जिल्ह्यातील किमान 100 खात्यांच्या वारसदारांचा शोध घेण्यात येत आहे. या दावे न केलेल्या खात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या वारसदारांचा शोध घेऊन त्यांना ही रक्कम परत करणे बँकांन अनिवार्य करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या वाडवडिलांची नावे आहेत का, याची माहिती घेण्यासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर जावे लागेल.

Unclaimed Deposits म्हणजे काय तर दावा नसलेली ठेव, रक्कम काय असते आणि त्याविषयी काय होते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर एखाद्या व्यक्तीने खाते उघडल्यानंतर त्यात काही व्यवहार केला. त्यात काही रक्कम जमा केली. ठेव ठेवली. त्यानंतर काही दिवसांनी या खात्याकडे त्यानं ढुंकूनही पाहिले नाही. दहा वर्षांत या खात्यात रक्कम टाकण्यात आली नाही अथवा रक्कम काढण्यात आली नाही तर केंद्र सरकार हे खाते अनक्लेम डिपॉझिट म्हणून ग्राह्य धरते. यातील रक्कमेवर कोणी दावा सांगितला आणि पुरावा दिला तर ही रक्कम त्या व्यक्तीला अथवा वारसदारांना मिळते.

हे सुद्धा वाचा

अशी मिळेल रक्कम अनेकदा घरच्यांपासून लपवून बँक खाते उघडण्यात येत होते. अडी-अडचणीच्या काळात रक्कम हाताशी रहावी यासाठी बचत करण्यात येत होती. पण काही कारणाने या खात्याचा विसर पडला. खातेदाराचा मृत्यू ओढावल्यास ही रक्कम तशीच पडून होती. या पैशांवर तुम्हाला हक्क सांगता येईल. त्यांनी योग्य कागदपत्रे आणि पुरावे सादर केले तर ही रक्कम मिळू शकते.

35,012 कोटी रुपये कोणाचे? भारतीय बँकांमध्ये अनेक खातेदारांचा पैसा पडून आहे. खाते उघडल्यानंतर या खात्यात त्यांनी रक्कम जमा केली. काहींनी मुदत ठेव ठेवली. याविषयीची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिली नाही. खातेदार जग सोडून गेल्यानंतर ही रक्कम तशीच पडून आहे. देशातील अनेक बँकांमध्ये जवळपास 35,012 कोटी रुपये पडून आहेत. मार्च 2022 मध्ये ही रक्कम 48,262 रुपये होती.

अशी आहे प्रक्रिया

  1. प्रत्येक बँकेने निष्क्रिय खात्यांची एक यादी तयारी केली आहे
  2. ही यादी तपासण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर जावे लागेल
  3. यादीत तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव आढळल्यास संबंधित शाखेत जावे लागेल
  4. याठिकाणी एक अर्ज भरुन द्यावा लागेल. या क्लेम फॉर्म भरुन कागदपत्रे जोडावे लागतील
  5. यामध्ये वारस असल्याची सिद्ध करणारी कागदपत्रे लागतील
  6. मृत खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र वा दाव्याशी संबंधीत कागदपत्रे लागतील
  7. रक्कम मोठी असल्यास घरातील सदस्यांची ना हरकत प्रमाणपत्र लागेल
  8. विहित प्रक्रियेनंतर वारसदाराच्या खात्यात व्याजासहित रक्कम जमा करण्यात येईल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.