Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAN-Aadhar Link: तुमचं आधार-पॅन लिंक आहे का? अखेरचे 7 दिवस, अन्यथा दुप्पट दंडाचा भुर्दंड

जर तुम्ही 1 जुलैच्या नंतर पॅन लिंक करत असल्यास तुम्हाला 1000 रुपये दंडाचा भार निश्चितच सहन करावा लागेल.

PAN-Aadhar Link: तुमचं आधार-पॅन लिंक आहे का? अखेरचे 7 दिवस, अन्यथा दुप्पट दंडाचा भुर्दंड
पॅनला आधार कार्ड लिंकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 9:12 PM

नवी दिल्ली- तुम्ही अद्यापही तुमचे आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक आहे का? (Aadhar card link to Pan) तुम्ही अद्यापही आधार कार्ड लिंक केले नसल्यास तुम्हाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड हे पॅन (Pan) कार्डला लिंक करणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही 30 जून 2022 किंवा त्यापूर्वी आधार कार्ड हे पॅनला लिंक केल्यास तुम्हाला 500 रुपये दंडात्मक (Punitive) स्वरुपात द्यावे लागतील. जर तुम्ही 1 जुलैच्या नंतर पॅन लिंक करत असल्यास तुम्हाला 1000 रुपये दंडाचा भार निश्चितच सहन करावा लागेल. म्हणजेच, तुमच्याकडे आधार कार्ड हे पॅनला लिंक करण्यास अवघे सात दिवस शिल्लक आहेत.

नेमका नियम काय?

आयकर कायद्यानुसार मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक न करणाऱ्यांस अतिरिक्त संधी निश्चितच मिळेल. मात्र, त्यासाठी त्यांना दंडाचा भार सहन करावा लागेल. एक एप्रिल ते 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड अदा करावा लागेल. 31 मार्च 2023 नंतर पॅन-आधार लिंकिंग साठी 1000 रुपयांचे दंडात्मक शुल्क द्यावे लागेल. दंडात्मक शुल्क भरल्यानंतर लिंकिंग शक्य ठरणार आहे.

पॅन-आधार लिंक नसल्यास?

तुमचे आधार कार्ड हे पॅन सोबत लिंक नसल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पॅन निष्क्रिय ठरल्यास तुम्ही म्युच्युअल फंड, स्टॉक मध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करू शकणार नाही. बँकेत खाते उघडणं शक्य ठरणार नाही.

हे सुद्धा वाचा

कसं कराल लिंक?

· तुम्हाला सर्वप्रथम आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट http://www.incometax.gov.in वर लॉग-इन करणं अनिवार्य असेल.

· क्विक लिंक्स सेक्शन मधून Link Aadhaar (आधारला लिंक करा) पर्याय निवडा.तुमच्यासमोर नवीन विंडो उघडली जाईल.

· तुम्ही आता तुमचे पॅन, आधार तपशील तसेच नाव व मोबाईल नंबर एन्टर करा

· ‘I validate my Aadhaar details’ (मी माझे आधार तपशील प्रमाणित करत आहे) पर्याय निवडा आणि ‘Continue’ (पुढे सुरू ठेवा) पर्याय निवडा.

· तुमच्या मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल.

· ओटीपी एन्टर करण्याद्वारे ‘Validate’ (प्रमाणित करा) वर क्लिक करा.

· तुम्हाला विशिष्ट दंडाची रक्कम भरल्यानंतर आधार हे पॅन सोबत लिंक केले जाईल.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.