Unwanted Calls : नकोशा कॉलपासून आताच नाही मुक्ती! इतक्या दिवस अजून मनस्ताप

Unwanted Calls : नकोशा कॉलपासून लागलीच तुमची सुटका होण्याची चिन्हं नाहीत. त्यामुळे मोबाईलधारकांना अजून इतक्या दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

Unwanted Calls : नकोशा कॉलपासून आताच नाही मुक्ती! इतक्या दिवस अजून मनस्ताप
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 5:34 PM

नवी दिल्ली : नकोशा कॉलपासून आणि मॅसेजपासून सूटका होण्याची लागलीच चिन्हं नाहीत. दूरसंचार विभागाने नकोशे कॉल (Unwanted Calls) आणि मॅसजेची ओळख करुन त्यांना रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिले होते. त्यासाठी एक निश्चित कालावधी दिला होता. पण आता डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी या टेलिकॉम कंपन्यांना (Telecom Companies) मुदत वाढून देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईलधारकांना अजून इतक्या दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यांची या कॉल्स आणि मॅसेजच्या डोकेदुखीपासून सुटका नाही.

आता इतक्या दिवसांची मुदत डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी दूरसंचार विभागाने मुदत वाढवून दिली आहे. मोबाईलधारकांना या नकोशा कॉलपासून सूटका करण्यासाठी अजून 6 महिने प्रतिक्षा करावी लागेल. त्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. व्यावसायिक कॉल वा मॅसेज पाठविणाऱ्या संस्था आणि टेलिकॉम कंपन्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, कृत्रिम बुद्धीमतेवर आधारीत व्यवस्था डीसीए (Digital Consent Acquisition) लागू करावी लागेल. दूरसंचार कंपन्यांनी त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून मागितला होता.

याच महिन्यात करायची होती अंमलबजावणी गेल्या काही वर्षांपासून नकोशा कॉल, मॅसेजमुळे ग्राहकांना नाहकचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यांना एकाच दिवशी अनेक कंपन्या व्यावसायिक उत्पादने विक्रीसाठी कॉल करतात. त्याविरोधात अनेक ग्राहकांनी, मोबाईलधारकांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर दूरसंचार विभागाने यासाठी एक व्यवस्था तयार करण्याचे निर्देश दिले होते. या 13 जूनपासून एआय आधारीत यंत्रणा लागू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. एका महिन्यात या निर्णयावर अंमलबजावणीचे निर्देश होते.

हे सुद्धा वाचा

व्यावसायिकसह सरकारी संस्थांना सूट ट्राईने व्यावसायिकसह सरकारी संस्थांना ग्राहकांना कॉल अथवा मॅसेज पाठविण्याची सवलत दिली आहे. त्यासाठी ग्राहकांची अनुकूलता, परवानगी महत्वाची आहे. कोणते मॅसेज ग्राहकाला हवे, कोणती सेवा ग्राहक अपेक्षित करतो, त्याविषयीची निवड ग्राहकाला करु देण्याचे निर्देश ट्रायने कंपन्यांना दिले होते. तसेच याप्रकारची सेवा, मॅसेज, कॉल थोपविण्यासाठी, थांबविण्यासाठीची प्रक्रिया प्रत्येक मॅसेजमध्ये देणे बंधनकारक करण्याचे धोरण ट्रायने स्वीकारले आहे. हे नकोसे कॉल आणि मॅसेज सुरु करण्याचे, बंद करण्याचे स्वातंत्र्य पूर्णता मोबाईलधारकांना असावे असे ट्रायने स्पष्ट केले आहे.

आता इतक्या दिवस मनस्ताप टेलिकॉम कंपन्यांना 31 जुलै 2023 रोजी पर्यंत डिजिटल परवानगीसाठी, अनुमतीसाठीचा आवश्यक प्लॅटफॉर्म तयार करतील. त्यानंतर 1 ऑगस्टपासून कॉल, मॅसेजसाठी डिजिटल अनुमती घेण्याची प्रक्रिया सुरु होईल. 31 ऑगस्ट पर्यंत अशा मोबाईलधारकांची कॉलबॅकची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून बँक, विमा, वित्तीय संस्था आणि व्यावसायिक संस्थांना 30 सप्टेंबरपर्यंत ग्राहकांकडून परवानगी, अनुमती घ्यावी लागेल. तर इतर संस्थांना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या उत्पादनाविषयीचे कॉल, मॅसेजची परवानगी घ्यावी लागेल.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.