UPI Payment : बँक खात्यात पैसा नसताना कसे होईल UPI Payment? एका क्लिकवर प्रश्नाचे उत्तर

UPI Payment : युपीआय पेमेंटने एक मोठी उणीव भरुन काढली आहे. खात्यात पैसा नसला तरी तुम्हाला युपीआय पेमेंटचा वापर करुन वस्तू खरेदी करता येणार आहे. कसे काम करेल हे फीचर, कसा येईल खात्यात पैसा, कसा करणार याचा वापर अशा अनेक प्रश्नाचं हे आहे उत्तर

UPI Payment : बँक खात्यात पैसा नसताना कसे होईल UPI Payment? एका क्लिकवर प्रश्नाचे उत्तर
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 5:50 PM

नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : तुमच्या स्मार्ट मोबाईलमधील युपीआय आता एक सुपर एप (UPI Super App) होत आहे. आता तुम्ही बचत खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड वॉलेट खाते जोडून त्याचा वापर करु शकता. कोणत्याही दुकानात जाऊन वस्तू खरेदी करु शकता. तुमच्या खात्यात रक्कम नसली, झिरो बॅलन्स (Zero Balance) असले तर हे फीचर आता मदतीला धावणार आहे. खात्यात छद्दाम नसला तरी युपीआय पेमेंट करता येईल. झिरो बॅलन्स असले तरी तुमच्या मोबाईलमध्ये युपीआय हिरो असल्याने तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. युपीआय पेमेंटचा (UPI Payment) वापर करुन ग्राहकाला वस्तू खरेदी करता येईल. कसे काम करेल हे फीचर, कसा येईल खात्यात पैसा, कसा करणार याचा वापर अशा अनेक प्रश्नाचं असं आहे उत्तर

RBI चे काय निर्देश

भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच बँकांना निर्देश दिले आहेत. बँक ग्राहकांना UPI Now, Pay Later ही सेवा देण्यासाठी काम करत आहे. ग्राहकांना एका निश्चित मर्यादेपर्यंत, झिरो बँलन्स असतानाही युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे. काय आहे ही सेवा, कसा मिळेल या सेवेचे लाभ, कशासाठी करता येईल या रक्कमेचा वापर असा सवाल अनेकांना पडला आहे. तर बँका आता ग्राहकांना प्री-अप्रुव्हड क्रेडीट लाईनची सोय करुन देणार आहे. बँक खात्यात झिरो बँलन्स असले तरी क्रेडीट लाईनच्या आधारे ग्राहक युपीआय पेमेंट करु शकतील.

हे सुद्धा वाचा

काय आहे Pre Approved Credit Line?

खऱ्या अर्थाने प्री-अप्रुव्हड क्रेडिट लाईन बँकांसाठी ओव्हरड्राफ्ट सुविधा असेल. सध्या बाजारात असणाऱ्या युपीआय मोबाईल एपच्या माध्यमातून त्याचा फायदा घेता येईल. क्रेडिट लाईन सेट-अप करण्यापूर्वी ग्राहकांना त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. एकदा क्रेडिट लाईनला परवानगी मिळाली की युपीआय पेमेंटच्या माध्यमातून वस्तू खरेदी करता येईल. निर्धारीत वेळेत, ड्यू डेटपर्यंत ही रक्कम फेडावी लागेल.

व्याज लागेल का?

क्रेडिट लाइनवर किती व्याज घ्यायचे याचा निर्णय आरबीआयने बँकांवर सोपावला आहे. काही बँका या सेवेसाठी व्याज आकारतात तर काही बँका एका निश्चित कालावधीसाठी व्याज आकारत नाही. ही सेवा जवळपास ‘Buy Now, Pay Later’ सेवेसारखीच काम करते.

या बँकांनी घेतली आघाडी

आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनानुसार, खासगी क्षेत्रातील दोन बँका HDFC Bank आणि ICICI Bank ने ‘यूपीआई नाऊ, पे लेटर’ सेवा सुरु केली आहे. एचडीएफसी बँक त्यासाठी 149 रुपयांचा वन टाईम प्रोसेसिंग चार्ज घेणार आहे. त्यानंतर क्रेडिट लाईन खाते उघडण्यात येईल. हे खाते तुमच्या डेबिट कार्डशी लिंक करण्यात येईल. आयसीआयसी बँक त्यासाठी ग्राहकांना युपीआय आयडी देईल. त्यासाठी बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही.

कोणाला फायदा

HDFC Bank आणि ICICI Bank सध्या 50,000 रुपयापर्यंत क्रेडिट लाईन ऑफर करत आहे. विविध ग्राहकांसाठी ही मर्यादा वेगवेगळी आहे. त्यासाठी तुमची क्रेडिट हिस्ट्री पण चेक करण्यात येईल. पण एक अट आहे. तुम्हाला मित्रांना पैसे अदा करता येणार नाही. दुकानदार, व्यापारी यांनाच तुम्हाला हे पेमेंट करता येईल.

Non Stop LIVE Update
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध.
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी.
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा...
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा....
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.