Special Report | गजेंद्र रेड्यासाठी 80 लाखांची बोली, तरीही मालकाची ना

Special Report | गजेंद्र रेड्यासाठी 80 लाखांची बोली, तरीही मालकाची ना

| Updated on: Dec 21, 2021 | 10:36 PM

कृषी प्रदर्शनात काहीना काही आकर्षणाचे असतेच. काळाच्या ओघात आता नव्याने येणाऱ्या यांत्रिकिकरणाचे आकर्षण शेतकऱ्यांना कायम राहिलेले आहे. पण सांगलीच्या तासगावात शिवार कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे तो एक रेडा…

कृषी प्रदर्शनात काहीना काही आकर्षणाचे असतेच. काळाच्या ओघात आता नव्याने येणाऱ्या यांत्रिकिकरणाचे आकर्षण शेतकऱ्यांना कायम राहिलेले आहे. पण सांगलीच्या तासगावात शिवार कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे तो एक रेडा…आता प्रदर्शनात रेडा यामध्ये काय विशेष असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पण या रेड्याचे वजन तब्बल दीड टन तर किमंत तब्बल 80 लाख रुपये. प्रदर्शनात शेतकऱ्यांसह व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांची तर गर्दी होत आहे पण खरा आकर्षनाचा केंद्रबिंदू ठरत आहे तो मंगसुळी येथील मुरा जातीचा गजेंद्र रेडा. सोमवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. मात्र, सोमवारपासून गजेंद्र रेड्याची अशी काय चर्चा सांगलीत रंगलेली आहे की नागरिकांची पावले आपोआप कृषी प्रदर्शनाकडे वळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित या कृषी प्रदर्शनात महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतच्या मंगसुळी येथून 1600 किलोचा रेडा दाखल झाला आहे. त्याला बघण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. या गजेंद्रला तब्बल 80 लाखाला मागणी सुद्धा आली होती. पण मालक विलास नाईक यांनी ही घरची पैदास असल्याने गजेंद्रला विकले नाही. आता पर्यंत गजेंद्र रेडा कर्नाटकसह चार प्रदर्शनाचे आकर्षानाचे केंद्रबिंदू राहिलेला आहे. दोन दिवसांपासून सांगलीच्या तासगाव येथे शिवार प्रदर्शनातही त्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे.

Published on: Dec 21, 2021 10:23 PM