New Education Policy | राज्यातील अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांना जोडणार? काय आहे नवं शैक्षणिक धोरण
VIDEO | राज्यातील १ लाख अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडणार, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कृती दलाची स्थापना
मुंबई : राज्यातील अंगणवाडी संदर्भात एक मोठी बातमी आहे. राज्यातील तब्ब्ल १ लाख अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील १ लाख अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याची तशी तयारी सुरू आहे. याकरता राज्यात नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy) तयार करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे. अंगणवाडी आणि खासगी शिशु वर्गातील मुलांसाठी एकच अभ्यासक्रम करण्यात येणार आहे. या सामायिक अभ्यासक्रमाची सुरूवात येत्या जूनपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकच येत्या काही दिवसात राज्यातील १ लाख अंगणवाड्या या प्राथमिक शाळांना जोडण्यात आल्याचे पाहायला मिळणार आहे.
Published on: May 06, 2023 10:20 AM
Latest Videos