VIDEO : Devendra Fadnavis | काही लोकांना हुतात्मा चौकात येऊन राजकारण करण्याची सवय – देवेंद्र फडणवीस
हुतात्मा स्मारकावर येऊन राजकीय स्टेटमेंट देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. आज महाराष्ट्र दिवस आहे. काही लोक या ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करतात. हुतात्मा स्मारक राजकीय स्टेटमेंट करण्यासाठी नाही. त्यामुळे राजकीय प्रश्नाला उत्तर देणार नाही. काही लोकांना कुठेही राजकीय प्रतिक्रिया देण्याची सवय असते. आम्ही ते करणारे नाहीत. हे हुतात्मा स्मारक आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या दिल्या
हुतात्मा स्मारकावर येऊन राजकीय स्टेटमेंट देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. आज महाराष्ट्र दिवस आहे. काही लोक या ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करतात. हुतात्मा स्मारक राजकीय स्टेटमेंट करण्यासाठी नाही. त्यामुळे राजकीय प्रश्नाला उत्तर देणार नाही. काही लोकांना कुठेही राजकीय प्रतिक्रिया देण्याची सवय असते. आम्ही ते करणारे नाहीत. हे हुतात्मा स्मारक आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. आज महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारकावर येऊन फडणवीस यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांचे कान टोचले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार आणि इतर आमदारही उपस्थित होते.
Latest Videos