Ratnagiri विमानतळासाठी 100 कोटी, Aditya Thackeray यांची माहिती
चिपी विमानतळ आणि मेडिकल कॉलेजची कामे सुरू होती. सिंधुरत्न स्किम सुरू केली. कोकणातील अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, कचरा या गोष्टीवर लक्ष देऊन काम सुरू आहे. आम्ही कोकणाचा शाश्वत विकास करणार आहोत, असे आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
रत्नागिरी : एअरपोर्ट व मेडिकल कॉलेजचे वचन पूर्ण झालंय. सिंधुरत्नचे वचन पूर्ण करतोय. रत्नागिरी एअरपोर्टला 100 कोटी देतोय. कोविड कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा फिरायला सुरुवात झाली आहे. गर्दी वाढू लागली आहे. कोविडमध्ये बंधनं होती. तरीही कामे कमी होती. कोविडच्या काळात पायाभूत सुविधांची कामे थांबली नव्हती. चिपी विमानतळ आणि मेडिकल कॉलेजची कामे सुरू होती. सिंधुरत्न स्किम सुरू केली. कोकणातील अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, कचरा या गोष्टीवर लक्ष देऊन काम सुरू आहे. आम्ही कोकणाचा शाश्वत विकास करणार आहोत, असे आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
Latest Videos