100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 11 September 2021

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 11 September 2021

| Updated on: Sep 11, 2021 | 9:21 AM

येत्या काही दिवसांमध्ये राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकमेव जागेवरून उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव सर्वाधिक प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेत.

येत्या काही दिवसांमध्ये राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकमेव जागेवरून उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव सर्वाधिक प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेत. मात्र, या जागेसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून लॉबिंग सुरु असल्याने अद्याप प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

राज्यसभेच्या या जागेवर आपल्याला संधी मिळावी यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक आणि माजी खासदार अविनाश पांडे इच्छूक आहेत. तर मुंबईतील काँग्रसचे नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्याकडूनही राज्यसभेच्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरु आहे. त्यामुळे आता हायकमांड कोणाच्या पारड्यात दान टाकणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.