100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 12 October 2021

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 12 October 2021

| Updated on: Oct 12, 2021 | 9:51 AM

अंमली पदार्थ नियामक कक्षाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे एनसीबीच्या झोनल डिरेक्टरपदी वानखेडे पुढील सहा महिने कायम राहतील. 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझ या जहाजावरील ड्रग्ज पार्टीवर घातलेल्या छाप्याचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह जवळपास 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.

समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.