100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 14 November 2021
त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ काल समाजातील एक गटाने केलेल्या लूटमार, जाळपोळ, आणि तोडफोडीच्या घटनांचे पडसाद आजही दिसत आहे. आज सकाळी अमरातीत मोठ्या संख्येने जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. तर शहरातील राजकमल चौक परिसरातील एका टपरीलाही एका जमावाने आग लावली.
त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात (Riots in Maharashtra) उमटत आहेत. राज्यातील अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त हिंसक वातावरण झालेले दिसत आहे. कालपासून अमरावती शहरात प्रचंड दणाव आणि दशहतीचे वातावरण आहे. आज अमरावतीतील (Amravati Riots ) राजकमल चौकातही मोठ्या संख्येने जमाव एकवटला असून दुकानांची तोडफोड केली जात आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस (Amravati Police) आणि पालकमंत्र्यांनी केलेले असूनही जमावाकडून हिंसक घटना घडत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत कलम 144 लागू केले आहे.
त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ काल समाजातील एक गटाने केलेल्या लूटमार, जाळपोळ, आणि तोडफोडीच्या घटनांचे पडसाद आजही दिसत आहे. आज सकाळी अमरातीत मोठ्या संख्येने जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. तर शहरातील राजकमल चौक परिसरातील एका टपरीलाही एका जमावाने आग लावली. या टपरीतील सामान आधी काढून घेण्यात आले होते. मात्र भर बाजारातील या टपरीला आग लावल्याने परिसरात धूर आणि आगीचे मोठे लोट उठताना दिसत होते. दरम्यान हा प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला. त्यानंतर जमाव पांगला गेला.