100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 28 July 2021

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 28 July 2021

| Updated on: Jul 28, 2021 | 9:30 AM

गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांच या पुरामुळे अतोनात नुकसान झालं.

चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि स्थानिक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते

Published on: Jul 28, 2021 09:30 AM