100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 25 October 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला होता. मात्र, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आणखी एक छायाचित्र ट्विट करुन वानखेडे पिता-पुत्रांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला होता. मात्र, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आणखी एक छायाचित्र ट्विट करुन वानखेडे पिता-पुत्रांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका फेसबुकचा प्रोफाईल पिक्चर शेअर केला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचे छायाचित्र दिसत आहे. मात्र, या प्रोफाईलवर वानखेडे दाऊद असे नाव लिहले आहे. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे की दाऊद वानखेडे या संभ्रमात आणखीनच भार पडली आहे.
तत्पूर्वी ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या सर्व आरोपांचे खंडन केले होते. माझं नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हतं. आताही नाही. जन्मल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. शाळेत जाण्यापासून, कॉलेजला जाण्यापासून, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून, डिपार्टमेंटला जाण्यापासून, रिटायर होण्यापासून माझं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. हे कुणीतरी गैरवापर करुन किंवा बनावट केलं असेल, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही किंवा माहितीही नाही, असे स्पष्टीकरण समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दिले होते.