लग्नसमारंभातून 100 ते 150 जणांना विषबाधा, सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार

| Updated on: May 16, 2022 | 9:27 AM

एकाच वेळी एवढ्या लोकांना त्रास होऊ लागल्याने या परिसरातही खळबळ माजली आहे. यांना बरे करण्यासाठी आता डॉक्टरांची टीम कामाला लागली आहे. लवकरच सकारात्मक परिणाम दिसतील अशी अपेक्षा आहे.

परभणीत लग्नाच्या जेवणातून (Wedding Food) 100 पेक्षा अधिक लोकांना विषबाधा (Parbhani Food Poisoning) झाली आहे. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालात दाखल करण्यात आलं आहे. परभणी शहरातील दर्गा रोड येथील ही घटना आहे. विषबाधा झालेल्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू (Hospital) असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. रुग्णालया प्रशासनाचीही या घटनेने झोप उडवली आहे. या दिवसात लग्नसराईत अनेक ठिकाणी लग्नांचा धडाका सुरू आहे. मात्र जेवणाची योग्य काळजी न घेतल्यास तुमच्या आनंदात कधीही विर्जन पडू शकतं असेच हे उदाहण आहे. एकाच वेळी एवढ्या लोकांना त्रास होऊ लागल्याने या परिसरातही खळबळ माजली आहे. यांना बरे करण्यासाठी आता डॉक्टरांची टीम कामाला लागली आहे. लवकरच सकारात्मक परिणाम दिसतील अशी अपेक्षा आहे.

Published on: May 16, 2022 09:27 AM
परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचं काम युद्धपातळीवर, 50 मशिनरीच्या साहाय्याने काम सुरु
पब्जी खेळताना 16 वर्षीय तरुण पडला दुसऱ्या मजल्यावरून, जखमी तरुणार उपचार