महाराष्ट्र भूषण सोहळ्याला उष्माघाताचं ग्रहण, 11 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत
VIDEO | महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांचा आकडा 11 वर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपचाराधिन श्रीसदस्यांना भेट
मुंबई : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. तर अजूनही अनेकजण अत्यस्वस्थ आहेत. नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात या श्रीसेवकांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना त्यातील 11 जण असून मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांची विचारपूस केली. मुख्यमंत्री यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. तर हा कार्यक्रम सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळात भर उन्हात झाला. या कार्यक्रमात अनेक त्रुटी असल्यामुळे आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे उष्मघाताने या कार्यक्रमात लोकांचा जीव गेला असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहे.