Maratha Reservation : सोलापुरात बारावीच्या विद्यार्थ्याची करामत, चक्क उत्तर पत्रिकेतच लिहिलं…
सोलापुरात बारावीची एक उत्तरपत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे. या बारावीच्या विद्यार्थ्यानं पेपरात 'एक मराठा, कोटी मराठा' असं लिहिलं आहे. बारावीच्या सहामाही परीक्षेत विद्यार्थ्याने पहिल्या पानावर 'एक मराठा, कोटी मराठा' लिहिल्याने चांगलीची चर्चा होत आहे.
सोलापूर, ४ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आमरण उपोषण केलं होतं. दरम्यान, काल राज्य सरकारला जरांगे पाटील यांनी दोन महिन्याची मुदत दिली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. असं असताना सोलापुरात बारावीची एक उत्तरपत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे. या बारावीच्या विद्यार्थ्यानं पेपरात ‘एक मराठा, कोटी मराठा’ असं लिहिलं आहे. बारावीच्या सहामाही परीक्षेत विद्यार्थ्याने पहिल्या पानावर ‘एक मराठा, कोटी मराठा’ लिहिल्याने चांगलीची चर्चा होत आहे. तर हा पेपर देखील व्हायरल होत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ गावातील श्री. गणेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही करामत केली आहे. राज्यशास्त्राचा सहामाहीचा पेपर सोडविताना चक्क ‘एक मराठा, कोटी मराठा’ असं लिहिलेली उत्तर पत्रिका व्हायरल होत आहे. बीबीदारफळ येथील संकेत लक्ष्मण साखरे असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याची चर्चा आहे.