उज्जैन महाकाल मंदिरात भस्म आरती करताना उधळला गुलाल अन् नको ते घडलं, नेमकं काय झालं?
महाकाल मंदिरात भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. महाकाल मंदिराच्या गर्भगृहातील भस्म आरतीदरम्यान आग लागली. या आरतीदरम्यान आगीत पुजाऱ्यासह 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र आग वेळेत नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला
राज्यासह देशभरात होळी, धुळवडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत आहे. अशातच उज्जैनच्या महाकाल मंदिरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महाकाल मंदिरात भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. महाकाल मंदिराच्या गर्भगृहातील भस्म आरतीदरम्यान आग लागली. या आरतीदरम्यान आगीत पुजाऱ्यासह 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. आरती करताना गुलाला उधळल्याने आग लागली. मात्र आग वेळेत नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सर्व जखमींना तातडीनेजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आलं. महाकाल मंदिरातील भस्मारतीचे मुख्य पुजारी संजय गुरु, विकास पुजारी, मनोज पुजारी, अंश पुरोहित, सेवक महेश शर्मा आणि चिंतामण गेहलोत यांच्यासह अनेक जण जखमी झाले.
Published on: Mar 25, 2024 10:41 AM
Latest Videos