खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा, नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना

खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा, नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना

| Updated on: Jan 09, 2022 | 10:38 PM

चार दिवसात 180 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 1210 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. एकूण 1390 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे, राज्यातली रोजची रुग्णसंख्या पुन्हा 40 हजारांच्या पुढे गेली आहे, लोकांच्या सुरक्षेसाठी रात्र दिवस तैनात असणाऱ्या, कोरोनाकाळात तुमच्या आमच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा वाढतोय, कोरोनाचा प्रादुर्भाव नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. चार दिवसात 180 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 1210 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. एकूण 1390 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 30 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मुंबईतल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्युही झाल्याचे समोर आले आहे.