Badlapur School case : ‘माझ्या मुलाला सोडा, मला कोणी नाहीये…’, कल्याण कोर्टाबाहेर आंदोलकाच्या आईनं फोडला हंबरडा
बदलापूर येथील संतापजनक घटनेनंतर शेकडो बदलापूरकर रस्त्यावर उतरले यानंतर एकच आक्रोश पाहिला मिळाला. याप्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बदलापुरातील नामांकित शाळेत झालेल्या धक्कादायक घटनेनंतर दोन चिमुकल्या मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी संपूर्ण बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. कोणी शाळेच्या गेटवर ठिय्या मांडून बसले होते. तर शेकडो नागरिक बदलापूर रेल्वे स्थानकावर उतरून तब्बल 10 तास रेल रोको आंदोलन करताना दिसले. मात्र या अल्पवयीन चिमुरड्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरणं आंदोलकांच्या अंगाशी आलं आहे. नराधमाला आताच्या आता फाशीची शिक्षा द्या.. या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानंतर अनेक आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तब्बल दोन हजारहून अधिक लोकांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील 22 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या आंदोलनकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या 22 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचा निर्णय कोर्टाकडून सुनावण्यात आल्यानंतर आंदोलकांच्या नातेवाईकांना कोर्टाबाहेरच हंबरडा फोडला.