Sangli | कृष्णाकाठच्या 22 गावात 14 आरोग्य पथक कार्यरत, विश्वजीत कदम यांच्याकडून गावांना मदत
महापूर ओसरताच पुरबाधित गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत पतंगराव कदम यांच्या वतीने एक कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
महापूर ओसरताच पुरबाधित गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत पतंगराव कदम यांच्या वतीने एक कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून कृष्णाकाठच्या 22 गावात 14 आरोग्य पथके कार्यरत करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालय पुणे यांच्याकडून मदत आणि उपचार
पलुस तालुक्यातील कृष्णाकाठच्या महापूरबाधीत बावीस गावात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. भारती विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालय पुणे यांच्या विद्यमाने वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय सांगलीचे वैद्यकीय मदत व उपचार पथक गावोगावी फिरून पुरग्रस्तांची मोफत तपासणी व उपचार करीत आहेत.
Published on: Jul 31, 2021 11:54 AM
Latest Videos