AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Export Duty Issue : कांदा लिलाव बंद ठेवल्यास कारवाई? कांदा व्यापाऱ्यांना कोणी दिला इशारा?

Onion Export Duty Issue : कांदा लिलाव बंद ठेवल्यास कारवाई? कांदा व्यापाऱ्यांना कोणी दिला इशारा?

| Updated on: Aug 23, 2023 | 8:50 AM

गेल्या दोन एक दिवसापासून कांदा उत्पादक आणि कांदा व्यापारी हे आंदोलन करत आहेत. राज्याच्या अनेक ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. तर कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काविरोधात कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

नाशिक : 23 ऑगस्ट 2023 | टोमॅटो पाठोपाठ कांद्याने सरकारचा वांदा केला आहे. टोमॅटो पाठोपाठ कांदा चार पैसे शेतकऱ्याला मिळवून देत असतानाच केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर मोठा निर्णय घेण्यात आला. केंद्राने कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने राज्यभर त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. तर नाशिकच्या बाजार समितीसह राज्यातील 15 ते 16 बाजार समित्यांमधील कांद्याचे खरेदी-विक्रीचे कामकाज बेमुदत काळासाठी बंद ठेवले होते. त्यामुळे सुमारे 60 ते 70 कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्न व पुरवठा मंत्री पियुष गोयल (piyush goyal) यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जपान दौऱ्यावर असतानाच फोनवर चर्चा केली. तसेच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी केंद्रीय गोयल यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. ज्यानंतर केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा गोयल यांनी केली. हा कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केला जाईल. मात्र याच दरम्यान आता जिल्हा उपनिबंधकांनी कांदा व्यापाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे. तसेच कांद्याचे लिलाव पूर्ववर करण्याच्या सुचना केल्या आहेत. तर जे लिलाव करणार नाहीत त्यांचे परवाने रद्द केले जातील असाही इशारा देण्यात आला आहे. याबाबत लासलगावसह 15 प्रमुख बजार समित्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.

Published on: Aug 23, 2023 08:31 AM