Mumbai Corona Update | मुंबईत दिवसभरात 15 हजार 166 कोरोना रुग्णांची नोंद

| Updated on: Jan 05, 2022 | 9:30 PM

मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 15 हजार 166 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 13 हजार 195 रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर आज 1 हजार 218 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज दिवसभरात 714 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलीय.

मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव (Corona Outbreak) आता अधिक चिंताजनक बनत आले. राजधानी मुंबईत (Mumbai) तर आज कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळाला. मुंबईत आज तब्बल 15 हजार 166 नवे रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. तर तिन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 20 हजाराच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊनच्या दिशेनं सुरु आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 15 हजार 166 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 13 हजार 195 रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर आज 1 हजार 218 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज दिवसभरात 714 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलीय.