दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ‘इतके’ नगरसेवक शरद पवारांकडे जाणार
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील १६ नगरसेवक येत्या ५ जुलैला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पुन्हा नेते विलास लांडेंच्या उपस्थितीमध्ये हे सर्व जण शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये पक्षप्रवेशाची अंतिम चर्चा होऊन....
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याची एक बातमी समोर येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील १६ नगरसेवक येत्या ५ जुलैला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पुन्हा नेते विलास लांडेंच्या उपस्थितीमध्ये हे सर्व जण शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये पक्षप्रवेशाची अंतिम चर्चा होऊन ५ पाच जुलै रोजी हे सगळे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे, अशी शक्यता आहे. मात्र असे झाल्यास अजित पवार यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जाणार आहे. अजित पवार यांचा पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोठा प्रभाव आहे आणि याच पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी अजित पवार गटचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भातील काही चर्चा झाल्या असल्याची माहिती मिळतेय.