धक्कादायक... शाळेच्या शौचालयात 16 वर्षाच्या विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल अन् संपवलं जीवन, असं काय घडलं?

धक्कादायक… शाळेच्या शौचालयात 16 वर्षाच्या विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल अन् संपवलं जीवन, असं काय घडलं?

| Updated on: Jan 10, 2025 | 12:31 PM

मुंबईतील गोरेगावमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. १६ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच गळफास घेतला आहे. विद्यार्थिनीने बुटाच्या लेसचा आधार घेत शाळेच्या शौचालयात आत्महत्या केली आहे.

महाराष्ट्रातील मुंबईतील एका नामांकित शाळेत एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील गोरेगावमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. १६ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच गळफास घेतला आहे. विद्यार्थिनीने बुटाच्या लेसचा आधार घेत शाळेच्या शौचालयात आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपलं जीवन संपवणारी विद्यार्थिनी गेल्या काही दिवसांपासून नैराश्यावस्थेत होती. यातूनच तिने टोकाचं पाऊलं उचलल्याचे सांगितले जात आहे. अकरावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत गेली आणि नेहमीप्रमाणे तिच्या तासाला उपस्थित राहिली. काही वेळानंतर ही विद्यार्थिनी शाळेच्या शौचालयात गेली आणि तिच्या बुटाच्या लेसने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वेगानं तपास सुरू केला. घटनास्थळावर करण्यात आलेल्या तपासा पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पोलिसांनी मृत विद्यार्थिनीच्या पालकांना कोणावर संशय आहे का? या घटनेबद्दल विचारले असता, पालकांनी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले.

Published on: Jan 10, 2025 12:30 PM