Parliament Session : 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व, म्हणाले…
जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडली. 140 कोटी भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे, असे सांगत असताना नरेंद्र मोदी यांनी 18 अंकाचे महत्व सांगितले. ते म्हणाले, आपल्याकडे 18 पुराण आहेत. भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत. आता 18 वी लोकसभा आहे.
लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले, 18 वी लोकसभा नवीन ठराव लक्षात घेऊन काम करेल. नवीन जोश, नवा उत्साह आणि नवी गती मिळवण्याची ही संधी आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडली. 140 कोटी भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे, असे सांगत असताना नरेंद्र मोदी यांनी 18 अंकाचे महत्व सांगितले. ते म्हणाले, आपल्याकडे 18 पुराण आहेत. भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत. आता 18 वी लोकसभा आहे. 18 लोकसभा नवीन ठराव घेऊन काम करेल. नवीन जोश, नवा उत्साह आणि नवी गती मिळवण्याची ही संधी आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडली. आमचाही हा तिसरा कार्यकाळ आहे. यामुळे आम्ही तीन पट अधिक मेहनत करु. पहिल्यांदा नवीन संसद भवनात शपथविधी होणार आहे. संसदीय लोकशाहीसाठी महत्वाचा दिवस असल्याचेही त्यांनी म्हटले.