सकाळी 7 वाजेच्या 24 हेडलाईन्स, 4 मिनिटांत घ्या दिवसभरातील बातम्यांचा आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून पंतप्रधान मोदींच्या स्वागाताचं ट्वीट... पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना सभेतून मुंबईकरांसाठी मोठी घोषणा करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष...या महत्त्वाच्या बातम्यांसह जाणून घ्या इतर मोठ्या घडामोडी
राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत.प्रचाराचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच मुंबईत ३८ हजार कोटींच्या प्रकल्पांचं उद्धाटन मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्यासाठी ४ हजार पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. तर या खास दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. यावेळी घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे.
विकास कामांमुळे मुंबकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याच्या आशयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून पंतप्रधान मोदींच्या स्वागाताचं ट्वीट करण्यात आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यावर असताना सभेतून मुंबईकरांसाठी मोठी घोषणा करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष…या महत्त्वाच्या बातम्यांसह जाणून घ्या इतर मोठ्या घडामोडी