सकाळी 8 च्या 24 हेडलाईन्स, 4 मिनिटांत घ्या दिवसभरातील ताज्या बातम्यांचे अपडेट
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. दुपारी तीन वाजता होणार सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी दुपारी तीन वाजता होणार असून या सुनावणी करते संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशातच धनुष्यबाणावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास मुंबईचा कायापालट करू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएमसी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तर वेळ काढा आणि रोज १५ मिनिटं योगा करा, असा मोलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. पैसा बँकांमध्ये पडून राहिला तर मुंबईचा विकास कसा होणार, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना टोला.
बीएमसीवर २५ वर्ष सत्ता असणार्यांनी केवळ आपली घरं भरली, टक्कवारीच्या नादात मुंबईचे प्रश्न सोडवले नाहीत, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…