मध्य-पश्चिम रेल्वेवरील ‘या’ 20 स्थानकांचा होणार कायापालट, यात तुमचं रेल्वे स्टेशन आहे का? बघा
अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून त्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ रेल्वे स्थानकांचा आणि पश्चिम विभागातील मुंबई सेंट्रल मधील ८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील २० रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून त्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ रेल्वे स्थानकांचा आणि पश्चिम विभागातील मुंबई सेंट्रल मधील ८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फ्रेब्रुवारीला दूर दृश्य प्रणाली द्वारे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी केली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या १२ स्थानकांमध्ये भायखळा, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, विद्याविहार, कुर्ला, मुंब्रा, टिटवाळा, शहाड, इगतपुरी आणि सॅंडहस्ट रोड ही बारा स्थानके आहेत. तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स, ग्रॅट रोड, चर्नी रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी, मालाड आणि पालघर ही आठ स्थानके आहेत.