नाशिकच्या ‘ओम’ची बातच न्यारी, सायकलवरून अवघ्या 21 वर्षांच्या रामभक्तानं गाठली अयोध्या
अवघ्या 21 वर्षांच्या रामभक्तानं थेट नाशिकच्या नांदगावातून सायकलवर अयोध्या गाठली आहे. सलग नऊ दिवस सायकल चालवत नाशिकचा ओम ठाकूर हा रामलल्लांच्या अयोध्येत पोहचला आहे. तर येथील रामलल्लांचे दर्शन घेऊन पुन्हा नाशिकला जाणार असल्याचे त्या रामभक्तानं सांगितले आहे.
नाशिक, २ जानेवारी २०२४ : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी समस्त हिंदू उत्सुक आहेत. या नेत्रदिपक सोहळ्यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अवघ्या 21 वर्षांच्या रामभक्तानं थेट नाशिकच्या नांदगावातून सायकलवर अयोध्या गाठली आहे. सलग नऊ दिवस सायकल चालवत नाशिकचा ओम ठाकूर हा रामलल्लांच्या अयोध्येत पोहचला आहे. तर येथील रामलल्लांचे दर्शन घेऊन पुन्हा नाशिकला जाणार असल्याचे त्या रामभक्तानं सांगितले आहे. ओम संजय ठाकूर हा अवघ्या 21 वर्षांचा आहे. यापूर्वी त्याने उज्जैन गाठलं होतं. ओम ठाकूर याच्याशी टीव्ही 9 मराठीने बातचीत केली असता त्याने 500 वर्षानंतर राम मंदिर होतंय याचा आनंद व्यक्त केला आहे. 1370 किमीचा प्रवास सायकलवर करत अवघ्या 21 वर्षांच्या ओम ठाकूरने अयोध्या गाठली असून त्याचं ते स्वप्न असल्याचे त्याने म्हटले आहे.