राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा

राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा

| Updated on: Feb 28, 2024 | 5:21 PM

भाजपकडून बारामतीच्या जागेसाठी अद्याप कोणतीही नेमणूक करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागोसाठी देखील भाजपकडून निरिक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही. तर बारामतीची जागा ही अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४ : राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा पक्क्या झाल्यात. तर भाजपकडून या लोकसभेच्या 23 जागांसाठी निरिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. विविध आमदार, पदाधिकारी आणि मंत्र्यांची निरिक्षण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपकडून बारामतीच्या जागेसाठी अद्याप कोणतीही नेमणूक करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागोसाठी देखील भाजपकडून निरिक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही. तर बारामतीची जागा ही अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता असून रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आग्रही आहे. भाजपकडून 23 जागांवर निरिक्षक नेमण्यात आलेत त्यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, पुणे, नागपूर, भिवंडी, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, बीड लातूर, जालना, नांदेड, वर्धा, अकोला, भंडारा-गोंदिया गडचिरोली, सोलापूर, माढा, सांगली या जागांवर राज्यात निरिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Published on: Feb 28, 2024 05:21 PM