4 Minutes 24 Headlines | खतासाठी जात विचारणे महाराष्ट्रात चालू देणार नाही : मविआ

4 Minutes 24 Headlines | खतासाठी जात विचारणे महाराष्ट्रात चालू देणार नाही : मविआ

| Updated on: Mar 10, 2023 | 3:00 PM

खतासाठी जात विचारणे महाराष्ट्रात चालू देणार नाही असा हल्लाबोल महाविकास आघाडीने केला.

मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर आता अधिवेशनात शेतकऱ्यांच्याच नव्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच लागली आहे. केंद्र सरकारच्या खते खरेदी ई पास मशिनवर माहिती भरताना जातीचा रकाना आल्याने विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे. खत खरेदी करते वेळी शेतकऱ्यांना जात सांगावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तर शेतकरी हिच आमची जात आहे. खतासाठी जात विचारणे महाराष्ट्रात चालू देणार नाही असा हल्लाबोल महाविकास आघाडीने केला. याचवेळी ई पास मशिनवरिल ही चूक दुरुस्ती केली जाईल यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल अशी भूमिका राज्य सरकारने मांडली. याचवेळी शेतकऱ्यांसाठी वीज दरबार लागू होणार शेतकऱ्यांसाठी वीज दरवाज लागू होणार नाही फडणवीस आमचे विधान परिषदेतून घोषणा केली

Published on: Mar 10, 2023 03:00 PM