शिंदे-फडणवीस दिल्लीत अमित शाह यांना भेटणार, यासह अधिक बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

शिंदे-फडणवीस दिल्लीत अमित शाह यांना भेटणार, यासह अधिक बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

| Updated on: Jan 24, 2023 | 7:55 AM

मुंबईला भिकेला लावण्याचा डाव, मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे तोंड काळे करणारच, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर पलटवार..यासह ४ मिनिटांत जाणून घ्या दिवसभरातील २४ ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर असणार असून सहकार विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर राज्यपाल यांचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तार आणि विकास कामांवर चर्चा करण्यासाठी आज शिंदे- फडणवीस अमित शाह यांची भेट घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांची माणसं म्हणणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावू नये, मोदींचाच फोटो लावून मतं मागा, एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान केले आहे.

बाळासाहेबांमुळेच आमच्यात धाडस, परिणामांची चिंता नाही, असे विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तांतरावरून विरोधकांवर टोलेबाजी केली. तर मुंबईला भिकेला लावण्याचा डाव, मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे तोंड काळे करणारच, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर पलटवार..यासह ४ मिनिटांत जाणून घ्या दिवसभरातील २४ ताज्या घडामोडी

Published on: Jan 24, 2023 07:44 AM