VIDEO : 25 Fast News | 1 PM | 25 महत्वाच्या बातम्या | 18 June 2022
सैन्यात 4 वर्षांच्या भरतीसाठीच्या अग्निपथ योजना सुरू करत देशातील बेरोजगांराना संधी देण्याचे काम केंद्राकडून करण्यात आले आहे. मात्र या योजनेला विविध राज्यातून विरोध होताना दिसतो आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे शेकडो तरुण अग्निपथ योजनेला विरोध करत आहेत, तर बिहारमध्येही या योजनेला चांगलाच विरोध होताना दिसतो आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अग्निपथ योजनेवरून ट्विट करत केंद्र सरकारच्या लष्कर भरतीच्या नव्या योजनेला विरोध केला आहे.
सैन्यात 4 वर्षांच्या भरतीसाठीच्या अग्निपथ योजना सुरू करत देशातील बेरोजगांराना संधी देण्याचे काम केंद्राकडून करण्यात आले आहे. मात्र या योजनेला विविध राज्यातून विरोध होताना दिसतो आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे शेकडो तरुण अग्निपथ योजनेला विरोध करत आहेत, तर बिहारमध्येही या योजनेला चांगलाच विरोध होताना दिसतो आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अग्निपथ योजनेवरून ट्विट करत केंद्र सरकारच्या लष्कर भरतीच्या नव्या योजनेला विरोध केला आहे. तरुणांना खूप राग येत आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. सेना ही आपल्या देशाची शान आहे, आपल्या तरुणांना आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण करायचे आहे, त्यांची स्वप्ने 4 वर्षात बांधून ठेवू नका असे म्हटलं आहे. तर यांसदर्भात संजय राऊत म्हणाले की, ठेकेदारी पध्दतीने सैन्य भरती म्हणजे हा सैन्याचा अपमानच आहे.