VIDEO : 25 Fast News | 1 PM | 25 महत्वाच्या बातम्या | 13 June 2022
संजय राऊत आणि निलेश राणे यांच्यामधील शितयुध्द थांबण्याचे नाव घेत नाहीये. संजय राऊत हे दोन दिवसांसाठी ईडीचा ताबा मागत आहेत, जसे काही दोन हजार रुपये मागत आहेत, असा टोला नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. फक्त दोन दिवस ईडीचा ताबा द्या, देवेंद्र फडणवीससुद्धा शिवसेनेला मत देतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. संजय राऊत यांच्या याच वक्तव्याचा समाचार आता निलेश राणे यांनी घेतला आहे.
संजय राऊत आणि निलेश राणे यांच्यामधील शितयुध्द थांबण्याचे नाव घेत नाहीये. संजय राऊत हे दोन दिवसांसाठी ईडीचा ताबा मागत आहेत, जसे काही दोन हजार रुपये मागत आहेत, असा टोला नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. फक्त दोन दिवस ईडीचा ताबा द्या, देवेंद्र फडणवीससुद्धा शिवसेनेला मत देतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. संजय राऊत यांच्या याच वक्तव्याचा समाचार आता निलेश राणे यांनी घेतला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत हा टोला भाजपाला लावला होता. ईडीच्या गैरवापरावरून राज्यात महाविकास आघाडी सरकार सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहे. त्यात संजय राऊत यांनी राज्यसभेच्या पराभवानंतर आपला संताप ईडीवर टीका करून केला होता.
Published on: Jun 13, 2022 01:57 PM
Latest Videos