INDIA Alliance | इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरली महत्त्वाची रणनीती, बैठकीत कोणते झाले महत्त्वाचे ठराव
VIDEO | आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये महत्त्वाची रणनीती ठरली आहे. राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया लवकरच होणार असल्याचेही शक्यता
मुंबई, १ सप्टेंबर २०२३ | देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. देशभरातील महत्वाचे नेते मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीत तीन मोठे आणि महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे ठराव महत्त्वाचे मानले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी मोठी रणनिती आज तयार कण्यात आली. या रणनीतीचा एक भाग म्हणून हे तीन ठराव करण्यात आले आहेत. या ठरावातील पहिला ठराव म्हणजे आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुका शक्य तितक्या एकत्र लढण्याचा संकल्प करतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागा वाटपाची व्यवस्था ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरात लवकर जागा वाटपाची ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दुसरा…आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष देशातील वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रितपणे सार्वजनिक रॅली आयोजित करण्याचा संकल्प करतो आणि तिसरा म्हणजे आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष विविध भाषांमध्ये ‘जितेगा भारत’ या थीमसह आमच्या सर्व धोरणे आणि मोहिमांमध्ये समन्वय साधण्याचा संकल्प करतो.