मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! तिकीटात मिळणार इतकी सवलत
कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार तिकीट दरात सवलत? कधीपासून होणार निर्णयाची अमंलबजावणी?
नागपूर : नागपूर मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण आता मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेट्रोच्या तिकीटात ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. उद्यापासून या निर्णयची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात ही सवलत देण्यात येणार आहे. महा मेट्रोने बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात सवलत देण्याचा निर्णय घेतला, नागपूर मेट्रोचे नवे दर हे ७ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. नवे दर लागू झाल्यानंतर महाकार्डचा वापर करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना हा फायदा मिळणार आहे. हे विद्यार्थी शाळा-महाविद्यालयाशिवाय इतर ठिकाणी देखील प्रवास करू शकणार आहेत.
Published on: Feb 06, 2023 08:21 AM
Latest Videos