सुनिल तटकरे यांच्या नाराजी नाट्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
VIDEO | शिवराज्याभिषेक सोहळा अन् सुनिल तटकरे यांच्या नाराजीनाट्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाष्य
रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला होता. दरम्यान, रायगडावर मोठ्या दिमाखात महाराजांचा हा सोहळा पार पडला होता. त्या अविस्मरणीय क्षणाला आज तिथीनुसार, 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. एकीकडे हा सोहळा जंगी स्वरूपात होताना दिसतोय तर दुसरीकडे या कार्यक्रमाच्या वेळी मात्र नाराजी नाट्य पाहायला मिळालं. खासदार सुनील तटकरे या शिवराज्याभिषेक सोहळ्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आजचा दिवस चांगला आहे. आमच्या सोबत सगळे कार्यक्रम खासदार सुनिल तटकरे यांनी केले. 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळा हा ऐतिहासिक क्षण होता. या सोहळ्याचे सर्व मानकरी आणि साक्षीदार झालेत, हे कोणाच्या भाग्यात नसतं. त्यामुळे सगळ्यांनी हा सोहळा साजरा केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनिल तटकरे यांच्या नाराजीवर दिली.