36 जिल्हे 72 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

36 जिल्हे 72 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

| Updated on: Jul 25, 2021 | 8:56 PM

लोकप्रियतेसाठी मी कोणतीही घोषणा करणार नाही. पण कोणालाही मी वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले

36 जिल्हे 72 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1) महाडमधील तळीये येथे सलग चौथ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आज येथे आणखी सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. दुर्घटनेत एकूण 49 जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती आले आहेत.

2) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण येथील मुख्य बाजारपेठेत पाहणी केली. त्यांनी दुकानदारांच्या भेटी घेतल्या. तसेच परिस्थितीची पाहणी केली.

3) चिपळूण येथे अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. आम्हाला आश्वासन नको, आम्हाला मदत करा, असा टाहो एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर फोडला.

4) मुख्यमंत्र्यासमोर अश्रू मांडताना व्यापाऱ्यांना अश्रू अनावर झाले. तुम्ही आमचे मायबाप, आम्हाला जगवा असा टाहो एका व्यापाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर फोडाला.

5) लोकप्रियतेसाठी मी कोणतीही घोषणा करणार नाही. पण कोणालाही मी वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.