36 जिल्हे 72 बातम्या | जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
पूरग्रस्तांसाठी दोन दिवसांत आर्थिक मदतीची घोषणा केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
36 जिल्हे 72 बातम्या |
1) पूरग्रस्तांसाठी दोन दिवसांत आर्थिक मदतीची घोषणा केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
2) पूरग्रस्तांसाठी दहा हजारांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. घरात आणि दुकानात पाणी शिरलेल्यांना ही मदत दिली जाणार आहे. तर अन्नधान्य खऱेदीसाठी 5 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.
3) राज्यामध्ये 290 रस्ते बंद असून 469 रस्त्यांवरची वाहतूक खंडित आहे. तर 140 पूल पाण्याखाली गेले आहे. या सर्व नुकसानीची पाहणी करण्याचे निर्देश मंत्री अशोक चव्हाण दिले आहेत.
4) ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे, अशा गावांसाठी संरक्षण भिंत उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
5) मुख्यमंत्री साताऱ्यात पाटण येथे पूरपरिस्थितीचा दौरा करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र या भागात पाऊस असल्यामुळे ठाकरेंचे हेलिकॉप्टर पुण्यात परत आले.