36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 17 October 2021

36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 17 October 2021

| Updated on: Oct 17, 2021 | 7:45 PM

24 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची परीक्षा होणार आहे. राज्य स्तरावरील 24 आणि मंडळ स्तरावरील 28 अशा एकूण 52 संवर्गासाठी ही भरती परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून 2 हजार 739 रिक्त पदे भरती जाणार आहेत. त्यासाठी एकूण 4 लाख 5 हजार 156 अर्ज प्राप्त झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आरोग्य विभागात 100 टक्के रिक्त पदे भरण्याची परवानगी दिली आहे.

दोन वेळेला रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षांची तारीख अखेर ठरली आहे. 24 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे. राज्य स्तरावरील 24 आणि मंडळ स्तरावरील 28 अशा एकूण 52 संवर्गासाठी ही भरती परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून 2 हजार 739 रिक्त पदे भरती जाणार आहेत. त्यासाठी एकूण 4 लाख 5 हजार 156 अर्ज प्राप्त झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आरोग्य विभागात 100 टक्के रिक्त पदे भरण्याची परवानगी दिली आहे. न्यास एजन्सीमार्फत ही परीक्षे घेण्यात येणार आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरुच आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत आहेत. एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यानं परीक्षार्थींना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने संबंधित कंपनीला आदेश देऊन परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सगळ्या परीक्षा MPSC मार्फतच घ्या अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सगळ्या परीक्षार्थींना एसटीचा प्रवास मोफत करु देण्याची मागणीही त्यांनी दिली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सुरु असलेल्या गोंधळावरुन रोहित पवार यांनी सरकारकडे या महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.