Water Cut For 36 Hours : तब्बल ३६ तास पाणीपुरवठा राहणार बंद, कुठं असणार पाणीबाणी?

Water Cut For 36 Hours : तब्बल ३६ तास पाणीपुरवठा राहणार बंद, कुठं असणार पाणीबाणी?

| Updated on: Oct 08, 2023 | 8:34 AM

VIDEO | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विजेची कामे, मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीच्या कामांसाठी सोमवार ते मंगळवार सायंकाळपर्यंत ३६ तासांचा पाणी पुरवठा राहणार बंद, पिण्यासाठी पाणी भरावे की वापरासाठी? महिलांना पडला प्रश्न

पनवेल, ८ ऑक्टोबर २०२३ | तुम्ही पनवेलमध्ये किंवा आजुबाजूच्या परिसरात राहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पनवेल आणि आजुबाजूच्या परिसरात तब्बल ३६ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. उद्या सकाळी ९ वाजेपासून ते मंगळवारी संध्याकाळपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विजेच्या कामासह इतर कामासाठी हा पाणीपुरवठा बंद असणार आहे. पनवेलसह कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, काळुंद्रे व करंजाडे या वसाहतींसह अनेक गावांमध्ये होणार नसल्याची माहिती सिडको महामंडळाने जाहीर केले आहे. सिडको मंडळाने सोमवार ते मंगळवार असे दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात रविवारी रात्रीपासूनच पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

Published on: Oct 08, 2023 08:21 AM