36 जिल्हे 72 बातम्या | 16 November 2021
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. काँग्रेसने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं.
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. काँग्रेसने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.
Latest Videos