36 जिल्हे 50 बातम्या | 18 October 2021
राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. येत्या एक-दोन दिवसांत राज्यातील सर्व भागांमध्ये कोरडे हवामान राहील. कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.
राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. येत्या एक-दोन दिवसांत राज्यातील सर्व भागांमध्ये कोरडे हवामान राहील. कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना काही काळ उष्णतेचा त्रास सहन करावा लागेल.
तत्पूर्वी बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी राज्यातील काही भाग वगळता सर्वत्र पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली होती. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मनाबाद या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.
औरंगाबाद शहरात परवा रात्रीपासून काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. शहरासह वाळूज परिसरात परवा रात्री दहा वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दौलताबाद, खुलताबाद, सोयगाव परिसरालाही रात्री अकरानंतर मध्यम ते मुसळधार पावसाचा फटका बसला. त्यामुळे मान्सून एकदाचा परतला म्हणत निःश्वास टाकलेल्या शेतकरी आणि नागरिकांना पुन्हा एकदा नव्या संकटाला सामोरे जावे लागले.