36 जिल्हे 50 बातम्या | 29 October 2021
बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर आयकर विभागाची झाडाझडती दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरुच आहे. मागील दोन दिवसांपासून मोठा पोलीस बंदोबस्त असून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्याशी निगडित साखर कारखान्याच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

सहकार क्षेत्रातील नावाजलेल्या बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये आयकर विभागाने मागील दोन दिवसांपासून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. 27 ऑक्टोबरपासून ही कारवाई सुरु आहे. महाविकास आघाडीतील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हण यांच्या नांदेड जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जासंदर्भात ही तपासणी असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे आयकरच्या रडारवर असलयाचे दिसते.
Latest Videos