36 जिल्हे 50 बातम्या | 27 September 2021
येत्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाकडून त्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होऊ शकतो.
येत्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाकडून त्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होऊ शकतो. मंगळवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.
गुलाब चक्रीवादळाचा मोठा परिणाम आज महाराष्ट्रात जाणविण्याची आहे. विदर्भ मराठवाड्यासह 11 जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या काही दिवसांत परतीचा पाऊस धुमाकूळ करेल, असा इशारा के एस होसाळीकर यांनी दिला आहे. पुढचे 4 दिवस राज्यांतल्या विविध भागांत कमी अधिक प्रमामात पावसाची शक्यता आहे.
Latest Videos