36 जिल्हे 72 बातम्या | 27 August 2021
भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक फ्लेक्स शेअर केला आहे. ज्यामध्ये राणेंच्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याचा उल्लेख करण्यात आलाय. राणे आज रत्नागिरी जिल्ह्यात असतील तर पुढचे दोन दिवस सिंधुदुर्गात असतील. नितेश राणेंनी शेअर केलेल्या फ्ले्सवर देखील "योद्धा पुन्हा मैदानात", असं लिहिलं आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक फ्लेक्स शेअर केला आहे. ज्यामध्ये राणेंच्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याचा उल्लेख करण्यात आलाय. राणे आज रत्नागिरी जिल्ह्यात असतील तर पुढचे दोन दिवस सिंधुदुर्गात असतील. नितेश राणेंनी शेअर केलेल्या फ्ले्सवर देखील “योद्धा पुन्हा मैदानात”, असं लिहिलं आहे.
राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी येणाऱ्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा दौरा अचानक रद्द झालेला आहे. आजचा होणारा दौरा रद्द झाल्याचे प्रशासनातर्फे सुचित करण्यात आले आहे. यापाठीमागील ठोस कारण आणखी समजू शकलेलं नाही.
नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील नियोजित कोकण दौरा होता. परंतु त्यांनी केलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वक्तव्याने मंगळवारी दिवसभर राडा झाला. पोलिसांनी त्यांना अटक केली. रात्री उशिरा त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर मध्यरात्री त्यांनी महाडवरुन मुंबईकडे प्रयाण केलं. दोन दिवस म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी आराम करुन आजपासून पुन्हा त्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु होत आहे.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
