Mumbai Corona | मुंबईच्या भायखळा तुरुंगात 39 कैद्यांना कोरोनाची लागण

Mumbai Corona | मुंबईच्या भायखळा तुरुंगात 39 कैद्यांना कोरोनाची लागण

| Updated on: Sep 26, 2021 | 6:32 PM

मुंबईच्या भायखळा तुरुंगात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचे आकडे वाढताना पाहायला मिळत आहेत. मागच्या दहा दिवसात ज्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांमध्ये भायखळा तुरुंगात 120 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

मुंबईच्या भायखळा तुरुंगात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचे आकडे वाढताना पाहायला मिळत आहेत. मागच्या दहा दिवसात ज्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांमध्ये भायखळा तुरुंगात 120 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 39 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या कैद्यांमध्ये 10 महिला आणि 5 लहान मुलांचादेखील समावेश आहे.

कोरोना बाधित कैदी क्वारंटाईन

कोरोना रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याने त्यांना बाजूच्याच एका शाळेत क्वारंटईन करण्यात आल्याचे सांगण्यात आलंय. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमधील गर्भवती महिलेला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपर्कात आलेल्यांचीही विशेष काळजी घेतली जात आहे.

Published on: Sep 26, 2021 06:32 PM